Thursday, April 2, 2009

रेल्वे स्टेशन

तुम्हाला रेल्वेत बसवलं

आणि नकळत डोळे ओले झाले

काय माहित त्यांना काय झालं होतं ते

मला निटसं काही समजत नव्हतं

पण मन माझं खंबीर होतं

कारण मला माहित होतं तुम्ही जाणार हे

पण डोळ्यांना काय झालं काय माहित

ते नुसते अश्रुंना बाहेर टाकत होते

अनेकदा त्यांना पुसलं आणि शांत राहण्याचा प्रयत्न केला

मी शांत बसलो पण डोळे शांत बसेना

त्यांना काय करावं हे मला काही समजेना

हा नेमका काय प्रकार आहे

हे मला नंतर-नंतर समजू लागले होते

डोळ्यांना माझ्या, ज्यांना रोज पहायची सवय झाली होती

ते काही दिवसांकरिता अदृश्य झाले होते


अरुणकिशन

१७ ऑक्टोबर०६

३.२६ दुपारी

उन्हाळ्याच्या सुट्टया

अनेक वेदना मनामध्ये घेऊन मी जगतो

आठवण येताच तिची मी पेटुन उठतो

रात्र माझी प्रत्येक जागण्यात माझी जाते

डोळे झाकताच मी तिच समोर येते

भेटण्याची आतुरता तिला आता असहाय्य होते

एकदातरी भेटावी ती मनी प्रार्थना हीच असते

उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता मला पोळत राहणार

विरहात तिच्या मी रोज थोडं-थोडं मरणार

तिला जर वाटत असेल माझ्याबद्दल काही

भेटण्याचा प्रयन्त करेल मला ती या उन्हाळ्याच्या सुट्ट्यातही


अरुणकिशन

१२ मार्च २००५

१०.२५ रात्री

तिच्या बाबतीत जेव्हा ऐकलं

तिच्या बाबतीत जेव्हा ऐकलं

तेव्हा काही क्षणात डोळे भरुन आले

जुने सर्व धुसर झालेले चित्र

झळाळुन समोर आले


मी मात्र तसाच बसुन होतो

शुन्यात जग पाहत होतो

शेवट झाला आता सर्व गोष्टींचा

मी आता मात्र हारलो होतो.


मी कधी अपेक्षाच केली नव्हती तीची

मग आज मला दुःख का व्हावे

जे झाले ते ठिकच झाले

यात माझे काय गेले


पण किती ही केल तर

या मनाच्या भावना

किती ही समजवा

काही केल्या त्या ऐकेना


स्वप्न होते म्हणुन सर्व विसरुन जाऊ

आणि पुन्हा नव्याने सुरुवात

फक्त आठवण येई तिची

जो पर्यंत आहे या कवितांची साथ


- अरुणकिशन (राहुल)

०१ फेब्रुवारी ०९

पहाटे ५.१८

आसाराम बापु

बापुच्या प्रवचनाला गर्दी झाली फार

ट्रक, बस, सुमो तर कोणी आणली कार

मोकळ्या जागेत जणू वसलं होत गाव

प्रत्येक वस्तूला तेथील आला होता भाव

छोट्-छोट्या वस्तूंची अनेक मांडली दुकानं

ग्राहक होते भरपुर खरेदी करत होते आवडीनं

दोन-तीन लाख लोकांचा समुद्र तीथे लोटला

बापुच्या भक्तीचा महिमा आज मलाही पटला

माणसाच्या श्रध्देचं हे नविन रूप मी पाहीलं होतं

बापुच्या नावाने आज हजारोंच पोट भरत होतं


- अरुणकिशन

दिनांक ११ फेब्रुवारी २००७

वेळ २.२५ पु.

Thursday, January 22, 2009

चेहरा

भेटतात चेहरे मला
मी भेटतो चेह-यांना
बघतात चेहरे मला
मी बघतो चेह-याना

राहतो मी चेह-यांसोबत
चालतो मी चेह-यांसोबत
बोलतो सुध्दा चेह-यांसोबत
पण मन गुपचुप असताना

माझा चेहरा आणि मी
दोघे भेटतो फक्त आरशामध्ये
पुन्हा वेगळे होतो आम्ही
सोबत नेहमी असताना

चेह-यांची ही दुनियासारी
दुनियेमधले चेहरे हे
मी सुध्दा त्यातलाच एक
मी माझा असताना

शोधतो मी एक ओळखीचा चेहरा
या चेह-यांच्या गर्दीमध्ये
मनास माझ्या हवा आसरा
मी एकटा असताना

भेटेल का असा कोणी
माझ्या या चेह-याला
सर्व काही समजुन घ्यावे
फक्त त्याला मी पाहाताना

- अरुणकिशन
दि. २२ जानेवारी २००९
वेळ – ७.२२ मि. संध्या.

सर्व काही संपुन गेल......

नेहमीच आता फोन वर बोलणं
भेटण मात्र संपुन गेलं
नेहमी फक्त आठवणं काढणं
सोबत राहणं संपुन गेलं

डोळ्यात एक उदासिनता
पाणी मात्र सुकुन गेलं
चेहरा फक्त पाहण्यासाठी
हसणं मात्र विरुन गेलं

पाय चाले संथ आता
घाई करणं संपुन गेलं
वाट कोणी पाहत नाही
रागवणं ही बंद झालं

हात फक्त कामासाठी
हात मिळवणं कमी झालं
कधी लिहाव काही तरी
पण लिखाण सुध्दा कमी झालं

आता फक्त श्वास आहे
आणि एक शरीर माझं
माझ आता माझं नाही
हे सुध्दा आता परकं झालं


- अरुणकिशन
२२ जानेवारी २००९
६. ४७ मि. संध्या.

Saturday, January 17, 2009

नेहमीच आठवण यावी अशी...

नेहमीच आठवण यावी अशी एकही संध्याकाळ जात नाही
तिच्या समवेत घालण्यासारखा एकही क्षण येत नाही

एकटे चालत जाणे एकट्याचाच प्रवास हा
सोबत चालण्यासाठी कोणी सोबत येत नाही

मध्येच थांबतो व एकवार मागे वळून पाहतो
पण नजरेत आपलसं वाटणारं कोणीच भरत नाही

एकटा असतो मी आता या विरान देशामध्ये
ओळखीचा वाटणारा एक चेहरासुध्दा दिसत नाही

मी मात्र फक्त पुढे- पुढे चालतो आहे
समोर काय असेल याची आता मुळीच तमा नाही

खर्च करुनी टाकलं आहे मी आता सर्व
कोणाला काही देण्यासारखे काहीच जमा नाही

- अरुणकिशन
०८ जानेवारी २००९
१०.२५ रात्री

काय माझ्या नशिबात हे असं कसं झालं

काय माझ्या नशिबात हे असं कसं झालं
एकीकडून बोलणं तर दुसरीकडून घोरणं आलं

रुम पार्टनर दोन मला दोघे लई भारी
एडजस्ट करुन घ्याव लागतं कसलेही असले तरी
एक उरीसी तर दुसर परभणीवालं
एकीकडून बोलणं तर दुसरीकडून घोरणं आलं

उरीसावाला तरुण जवान तर परभणी वाला काका
आपण पडलो मध्यस्थी म्हणुन आपलंच तोंड झाका
समजावून दोघांना तोंड माझं दुखुन गेलं
एकीकडून बोलणं तर दुसरीकडून घोरणं आलं

दिवसभर थकतो रात्री कसं तरी जेवतो
आणि पटकन जोऊन रुम मध्ये झोपतो
पण माझ्या नशिबाला हे कसंल बेन आलं
एकीकडून बोलणं तर दुसरीकडून घोरणं आलं

रात्री झोपावं म्हटलं तर कार्यक्रम रोजचे चालू
उरीसावाल्याचा फोन तर परभणीवाल्याचं घोरणं चालू
दोघांमध्ये माझा बेड माझी होते वैतागवाडी
एकीकडे प्रेमाच्या गुलाबी गप्पा दुसरीकडे रेलगाडी (घोरणं)
पलंगावर इकडून तिकडे माझ्या वळणंच आलं
एकीकडून बोलणं तर दुसरीकडून घोरणं आलं

-अरुणकिशन
१६ जानेवारी २००९
रात्री ११.०५ मि.

Sunday, November 30, 2008

तुझी आठवण येत नाही...

तुझी आठवण येत नाही
असा एक क्षण सुध्दा जात नाही
प्रत्येक गोष्टीत तुच दिसतेस
तुझ्याशिवाय दुसरे मी काहीच पाहत नाही

तुझ्याशी न बोलता राहिलो
असा एकही दिवस जात नाही
कॉलेजला सुट्टी जरी असली
तरी तुला मी फोन केल्याशिवाय राहत नाही

तुझं नाव येणार नाही ज्याच्यात
असा विषयचं मी काढत नाही
तुझ्याबाबतीत मिञांना, घरच्यांना
सांगीतल्याशिवाय मी बोलण थांबवत नाही

तुझा आवाज ऐकला नाही
असं आता तरी कधी होत नाही
मी जरी सुट्टी मारली, फोन नाही केला
तरी तु मला फोन केल्याशिवाय राहत नाही

तुझ्या एवढी चांगली कोणी असेल जगात
हा विचारंच मला पटत नाही
तुझ्या सारखी मैञीण मिळेल जगात दुसरी

हे मला काही शक्य वाटत नाही


- अरुणकिशन
१७ फेब्रुवारी २००७
वेळ – १.०५ पु.

Friday, November 28, 2008

टी-शर्ट

आज गणेश विसर्जनाचा दिवस. सर्वत्र ढोल ताशे वाजत होते. मी सुध्दा माझ्या मित्रांसोबत गणपती पहायला गेलो. गणपतीचा सण म्हणजे, ढोल-ताशे, विविध गणेश मंडळ. त्या-त्या गणेश मंडळाचे लेझीम पथक, टी-शर्ट. मी लहान असताना त्या गणपतीच्या सणाच्या काळात लेझीम खेळणा-यांना देण्यात येणा-या टी-शर्टचे मला फार आकर्षण होते. पण मला ते कधीच मिळालेच नाही. असो. अशा सार्वजनिक सणाच्या दिवशी पोलीस बंदोबस्त फार मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. आमच्या येथे तर    चौका-चौकामध्ये पोलीस उभे असतात. सध्या बॉम्बस्फोटाच्या चर्चेमुळे सुरक्षा व्यवस्था अजूनच कडक करण्यात आली होती. तसेच मुलींची छेड काढणा-यां टपोरी मुलांना पकडण्यासाठी पोलीस साध्या ड्रेसमध्ये सर्व लोकांत मिसळलेले असतात.

     मी माझे मित्र सर्व एका ठिकाणी बसुन गणपतीच्या मिरवणुका पाहत होतो. माझ्या एका मित्राने एका गणेश मंडळाचे टी-शर्ट घातले होते. काय माहीत कोणत्या गणेश मंडळाचे आणले होते. कारण तो ज्या कॉलनीत राहतो त्यांच्या गणेश मंडळाचे चे टी-शर्ट नव्हते. आम्ही बरंच वेळ झालं एकाच ठिकाणी उभे होतो. आम्ही ज्या ठिकाणी उभे होतो तो चौक फार महत्त्वाचा होता आमच्यासाठी. आम्ही रोज रात्री सर्व मित्र तेथे गप्पा मारत बसतो. तो आमचा ठरलेला कट्टाच आहे. गणपतीच्या काळात तर सर्व मिरवणुका तेथुनच जात आणि आम्ही या जाणा-या मिरणुका पाहत तिथेच बसलेलो. कधी मिरवणुक पहायची तर कधी मिरवणुक पाहकयला येणा-या सुंदर सुंदर मुलींना पहायचो. माझ्या मित्रांना फार छंद मुलींना पाहण्याचा. मी त्यांना अनेकवेळा सांगतो की, एखाद्या पोलीसाने आपल्याला पाहीले तर फालतु लफडे वाढेल. तसे माझे मित्र काही त्यांची छेड काढत नाहीत. फक्त येणा-या जाणा-यांना पाहतात.

            बराच वेळ झाला होता एकाच ठिकाणी बसुन आणि आज मिरवणुकीचा रस्ता सुध्दा बदलला होता पावसामुळे. त्या मुळे मी त्यांना दुस-या साईडला जाऊन आपण मिरवणुक बघु असे सांगितले. तिकडे फार गर्दी आहे असे सांगुन त्यांनी मला नकार दिला. तरी सुध्दा मी त्यांना रस्ताच्या दुस-या साईडला मिरवणुक पाहण्यासाठी नेले. मिरवणुकी पाहील्या. बराच वेळ मिरवणुकी पाहील्यानंतर आम्ही वापस आमच्या नेहमीच्या कट्टावर निघालो. गर्दी जास्त असल्यामुळे आम्ही मागेपुढे झालो. माझे मित्र मागे होते आणि मी एका मित्रासोबत पुढे चाललो होतो. नंतर मी मागे पाहीले असता ते दिसेनासे झाले होते म्हणुन मी त्यांना पाहण्यासाठी थांबलो. त्यांना पाहताना ते पुढे कधी गेले मला समजलेच नाही. मग मी त्यांच्या पाठीमागे निघलो. तितक्यात एक साडीघातलेली बाई हातात काठी घेऊन मागुन आली तिने माझ्या मित्राला (ज्याने गणेश मंडळाचा टी-शर्ट घातलेला) पकडले. मी खुप घाबरलो. कारण ती बाई काही तरी त्याला जोर-जोरात विचारत होती. ढोल-ताश्यांच्या आवाजामुळे मला काही ऐकु येत नव्हते. पण तीच्या हातवा-यावरुन ती त्याला रागवत होती असं वाटत होतं. मला वाटलं की, यांचा कुणाला धक्का तर नाही ना लागला का यांनी कोणाची छेड तर नाही ना काढली. मी खुपच घाबरलो. नंतर थोड्यावेळाने ती बाई त्याला बोलून निघुन गेली. मी पटकन जाऊन त्या मित्राला विचारलं की, कोण होती ती बाई? काय म्हणत होती? तो सुध्दा खुप घाबरलेला. तो थोड्या वेळ शांतच होता. नंतर तो म्हणाला की काही नाही ती मला विचारत होती की, आपलं गणेश मंडळ कुठे आहे....

                                                                                                                    -  १६ सप्टेंबर २००८                                                                                                                  

Tuesday, September 2, 2008

अभंग

गाडीचिये वरि गॉगल लावुनी भारी
ऐट फार मारि मुले आजची १

बुट घालुनी भारी किक जोरात मारी
गाडी वरती करी मुले आजची २

कटा-कुटा मारी मुली पाहत सारी
जोरात ब्रेक मारी मुले आजची ३

सुन्दर दिसताच पोरी सर्व पदचारी
शिट्ट्या मारत फिरी मुले आजची ४

थांबुनी रस्त्यावरी सॅंडल घेऊनी करी
काना मागे मारी मुली आजच्या ५

राहुल म्हणे आता सॅंडल रोज खाता
कधी शहाणी होणार मुले आजची ६


२ फेब्रुवारी २००५
रात्री- ११.४१.

Saturday, August 30, 2008

प्रपोज

तुझ्या सोबत जगायचं हे माझं सुख आहे
तुझ्या शिवाय जगायचं हे माझं दुःख आहे
तुझ्या मध्येच माझं सुख-दुःख सामावल आहे
तु माझ्यावर प्रेम करण हे माझं जीवन आहे
मी एकतर्फी प्रेम करणं हे माझं मरण आहे

प्रेम करणं ही माझी पहिलीच वेळ आहे
तुला प्रपोज करणं हा मोठ्ठाच खेळ आहे
खेळामध्ये उतरलो आहे मी
डाव तु अर्धा सोडू नकोस
प्रेम करत नाही तुझ्यावर
असं चुकून सुध्दा बोलु नकोस
प्रेमाचं गणित वेगळ मला काही सुटत नाही
इतका का मरतो तुझ्यावर मला काही कळत नाही
एकदा तरी म्हण आता की माझ तुझ्यावर प्रेम आहे
नाही तर मी ही कविता तुझ्या मैत्रीणीला देत आहे

तुझा असा अबोला...

तुझा असा अबोला
अस्वस्थ करतो मनाला
मी व्याकुळ होऊन जातो
तुझ्याशी दोन शब्द बोलायला

तुझा असा अबोला
आणि मला बोलावस वाटणं
तु बोलली नाहीस
तर जग खायायला उठणं

तुझा असा अबोला
जसा पावसात उन्हाळा
पावसात भिजावस वाटतं
पण होतो मी घामानी ओला.

तुझा असा अबोला
आणि मी वेडा खुळा
तु बोलत नसतेस
तरी मीच बोलता अनेक वेळा

तुझा असा अबोला
जशी फुलाची कळी
उमलण्या आधीच तिला
हळुच तोडुन नेतो माळी
तुझा असा अबोला
आणि सर्व जग शांत
कोणीच बोलत नसतं
जसा मुक्यांचाच हा प्रांत

तुझा असा अबोला
खात असेल तुझा तुलाच
मी बोलण सोडल तर
तु दोष देते मलाच

तुझा असा अबोला
एक दिवस खुप त्रास देईल तुला
तुला बोलावस वाटेल भरपुर
त्या वेळेस वेळ नसेल मला

तुझा असा अबोला
सोडुन दे आते तरी
तुझ्या आठवणीत मला भिजायच आहे
आल्यात श्रावणसरी

५ फेब्रुवारी २००७
१२.०५ पु.

Monday, August 25, 2008

पुन्हा पहिल्या सारखं

आता तू पहिले सारखं झ्याशी बोलत नाहीस
तुझा थोडा वेळ सुध्दा माझ्या समवेत घालत नाहीस

माझ्यावर तुझा राग आहे मी मान्य करतो
त्यसाठी मी तुला पुन्हा एकदा सॉरी म्हणतो

मला माफ करुन तू पुन्हा माझ्याशी बोलत रहा
पुन्हा एकदा नव्याने माझ्याशी मैत्री करुन पहा

तू बोलली नाहीस की, दिवस माझा कटतं नाही
मित्रांसोबत, घरच्यांसोबत कोणाशीही माझं पटत नाही

तुझी मात्रीच फक्त आता या जीवाला हवी आहे
छोट्या चुकीची फार मोठी सजा तू मला देत आहे

सजा तुझी मागे घे अशी फर्याद मी करतो
वाचलस तर या चुकीचा जुर्माना सुध्दा मी भरतो

जुर्माना काय आहे हे तू मला सांगुन पहा
पण माझ्याशी तू पहिले सारखं बोलत रहा

तुझ ते दोन वाजे पर्यंत थांबण मला सारखं आठवतं
तुझं आता न बोलता निघुन जाणं माझ्या डोळ्यात पाणी साठवतं

त्या लिंबाच्या झाडाखाली आपलं ते थांबणं
दोन वाजेची बस आली की, तुझ मला ते सांगणं
माझ्या समवेत असताना तुझं ते दुस-यांच्या बाबतीत बोलणं
मी तुझ्याकडे पाहिलं की, तुझं ते स्वतःशी खुदकन हासणं

ते लिंबाच झाड अजुन तुझी वाट पाहत आहे
तो त्या झाडाचा पार आपल्या मैत्रीची साक्ष देत आहे

तू रागावल्या पासुन माझी बस अजुन आली नाही
त्या दिवसा पासुन माझ्या घड्याळीत दोन कधी वाजलेच नाही

या सर्व गोष्टी मला वापस कर एवढेच तुला मी मागतो
या सर्व गोष्टींसाठी मी वाट्टेल तो जुर्माना भरतो

Sunday, August 24, 2008

Social Work

समाजकार्य समाजकार्य
असं किती दिवस चालायचं
तरुणपणाचं कार्य आम्ही
कधी पार पाडायचं

क्षेत्रकार्य, व्यक्ती सहकार्य
यांच्यातून आम्हाला ब्रेक हवा
कट्ट्यावरच्या गप्पा, कॅन्टीन मधील गोष्टी
याच्यासाठी सुध्दा थोडावेळ द्यावा

वर्षातील सोमवार, मंगळवार
आमचे तर तुम्ही काढून घेतले
चारचं दिवसांचा आठवडा आमचा
त्यात सुध्दा फाईल सबमिशन घातले

कॉन्फरन्सने आम्हाला
आला आहे खुप कंटाळा
आठवड्यातील एखादा दिवस तरी
घेऊ द्याना आम्हाला विरंगुळा


Saturday, August 23, 2008

मला वाटल जंगलामधील ...

मला वाटल जंगलामध्ये

मला वाटल जंगलामध्ये
मी एक सलुन उघडावं
सर्व सिंहांची दाढी करुन
त्यांना रांगेत उभं करावं

मला वाटल जंगलामधील
मी एक गोरखा व्हावं
सर्व घुबड वटवाघुळांना राञी
सातच्या आत झोपायला लावावं

मला वाटल जंगलामधील
मी एक कर्नल व्हावं
सर्व सश्यांना एकञ आणून
बंदूक चालवायला शिकवावं

मला वाटल जंगलामधील
मी एक वकील व्हावं
सर्व लांडग्यांना एकञ आणुन
त्यांना खरं बोलायला लावावं

मला वाटल जंगलामध्ये
मी एक हेल्थक्लब उघडावं
सर्व हत्ती गेंड्यांना त्यात भरती करून
त्यांना स्लीम बनवावं

मला वाटल जंगलामधील
मी एक चिञकार व्हावं
सर्व सरड्यांना एकञ करून
त्यांना एकाच रंगात रंगवावं

Tuesday, August 5, 2008

वादा

वादा

आजवर ती बोलत नव्हती
पण आज पहिल्यांदा ती बोलली
ओठींची मोहर तीनं
आज पहिल्यांदा खोलली

आज ती माझ्याजवळ आली
माझ्या बाजुला येऊन बसली
माझ्या सोबत गप्पा मारु लागली
गालातल्या गालात हासु लागली

मी तिच्या गप्पात रंगलो
तिच्याशी बोलण्यात दंगलो
एक सारखं पाहत होतो तीला
स्वप्न तीचे रंगवत होतो

ती दोन तास माझ्याशी बोलत होती
मला सर्व काही सांगत होती
माझ्या बद्दल विचारत होती
पण स्वतः बद्दल टाळत होती

नंतर तिनं विषय बदलला
ती मला म्हणाली
करतोस का रे माझ्याशी एक वादा
तु होतोस का रे माझा मोठा दादा

-अरुणकिशन

Monday, August 4, 2008

हे असचं असतं

हे असचं असतं हे असचं असतं!

का कोणाशी बोलायचं नसतं
रुसुन मग निघुन जायायच असतं
शब्दा-शब्दाचं हे भांडण असतं
असं गुपचुप बसायचं नसतं
हे असचं असतं

तो आला असता ती रागात बघते
तो गेल्यावरती डोळे तीचे आसवांनी भरते
तो दुर असताना बोलावसं वाटतं
तो समोर आल्यावर मुकं-मुकं बसायच नसतं
हे असचं असतं

मित्रांना घेऊन तिला छेडायचं असतं
रडू येई पर्यंत तिला चिडवायचं असतं
एकदा रडली ती की
मग हळुच जाऊन डोळे पुसायचं असतं
हे असचं असतं

पुन्हा दोघांनी मिळून रहायचं असतं
एकाच बस मध्ये कॉलेजला यायचं असतं
बसमध्ये त्याची मैत्रीण भेटली की
मग पुन्हा रुसुन बसायचं असतं
हे असचं असतं हे असचं असतं


अरुणकिशन

फोटोतल्या आठवणी

फोटोतल्या आठवणी

नमस्कार,

मी आपला मित्र.
आपल्या कॉलेज जीवनातील ह्या सर्व आठवणी लक्ष्यात राहण्यासाठी (छायाचित्र) फोटो हे एक उत्तम माध्यम आहे. फोटो हे नेहमीसाठी आपल्याजवळ आपल्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आठवण म्हणुन राहतात. आपल्या आवडत्या मित्र-मैत्रिणिंबरोवर घालवलेले क्षण, आपल्याजवळ दृश्य स्वरुपात राहण्यासाठी फोटो हे एक उत्तम माध्यम आहे. फोटो पाहत असताना हे फोटो आपल्याला नकळत त्या आठवणींत, त्या काळात, त्या सिच्युएशनला, त्या समारोहाची आठवण करुन देतात. अशा आठवणी आल्या की, त्या वेळी घडलेल्या चांगल्या वाईट आठवणी, त्या वेळचा प्रसंग, त्या वेळची मैत्री, तेथे आपल्या मित्र-मैत्रिणींशी उडालेले खटके, एखाद्याशी झालेली मैत्री, या सर्व आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. त्या कार्यक्रमाला एखाद्याची झालेली फजीती आपल्याला न कळत हसवुन जाते. एखाद्याशी झालेले भांडण आणि त्यावेळी आपण कसे वागलो हे सर्व आठवते व त्या वेळी आपण चुकीचे वागलो असे मग आज आपल्याला वाटण्यास हे फोटो भाग पाडतात.
फोटो हे एक फार प्रभावी माध्यम आहे. मनुष्याच्या आयुष्यामध्ये फोटोला नकळत एक फार महत्त्वाचे स्थान आहे. मुलगा जन्मला की, त्याच्या बारसे पासुन या फोटोचा प्रवास सुरु होतो. मग नंतर वाढदिवस, समारंभ, छोट-छोट उत्सव, असा या फोटोचा प्रवास चालू असतो. पुढे मग दहावीला सुरु होतो तो पासपोर्ट फोटोचा पाठलाग. मग हा पाठलाग कॉलेज, नोकरी, मतदान अश्या प्रकारे चालुच राहतो. मग पुढे आपल्या आयुष्याच्या एकदम महत्त्वाच्या टप्प्यावर या फोटोचे महत्त्व फारच वाढते. मग मॉडेलिंगचे फोटो, दुस-यांना दाखवण्यासाठीचे फोटो, आपल्या मित्र-मैत्रिंणींसोबतचे फोटो, त्याच्या/तिच्या सोबतचा आपला फोटो या सर्वांना एकदम वेगळेच स्थान निर्माण होते. त्याच्या/तिच्या सोबतचा आपला फोटो तोही चांगला निघावा यासाठी चाललेली त्यांची धडपड, फोटो काढुन झाल्यावर तो कसा निघतो या बाबतची लागलेली चिंता व उत्सुकता ही काही औरच असते. फोटो चांगला आल्यावर तो आपल्या मित्र-मैत्रिंणींना दाखवणे, पुस्तकाच्या पानात तो फोटो ठेऊन तासन्-तास तो निहाळणे आणि आई-बाबांना वाटावं की आपला मुलगा/मुलगी फार अभ्यासु आहे. तो फोटो घरात ठेवल्यानंतर तो कोणी पाहणार तर नाही ना म्हणुन येणारं टेन्शन हे फार मजेशीर असतं. त्याच्या अथवा तिच्या पाकिटात पैसे असणे ही गोष्ट महत्त्वाची न राहता एकमेकांचा फोटो असणे हे फार महत्त्वाचे बनते. या नंतर लग्नासाठी दाखवणा-या फोटोंची बारी येते. या वेळेस फोटोचे महत्त्व फारचं वाढते. हे फोटोच त्यांची लग्न ठरवण्याची प्रथम पायरी ठरतात. मग आयुष्याचा प्रवास सुरु होतो फोटोच्या सहाय्याने. मग लग्नाचे फोटो, मुलाच्या बारश्याचे फोटो, त्याच्या जावळाचे फोटो, मग कुटुंबात झालेल्या उत्सवाचे, समारोहाचे फोटो मग शेवटी एक फोटो शेवटचा तो म्हणजे .........
अशा प्रकारचा हा फोटोचा प्रवास आपल्या आयुष्याच्या सुरुवाती पासुन शेवट पर्यंत चालू राहतो. मग आपण गेल्यावर राहतात त्या फक्त आठवणी. फोटो पहाताना येणा-या आठवणी. फोटोतल्या आठवणी.

- राहुल कि. रणसुभे
(छायाचित्रकार)
३१ सप्टेंबर २००७
९.५० रात्री.